ॐ गं गणपतये नमः

महावाक्य


प्रजानाम्
ब्रम्हा |

"Consciousness is Brahman" ऐतरेय उपनिषद् ३.३ , ऋगवेदा


अयं आत्मा ब्रम्हा |

"This Self (Atman) is Brahman"

तत् त्व असि |


"Thou art That"


अहम् ब्रम्हास्मि |

"I am Brahman"


सार्थ श्रीसूक्त त्याचा अनुवाद

ॐ हिरण्यवर्णां हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम ।
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह।।१।।

हे अग्ने सुवर्णाप्रमाणे जिची कांती आहे, हरीणीप्रमाणे जी चंचल भावाची आहे, सोन्याचांदीच्या पुष्पहारांनी जी नटली आहे अशा चंद्राप्रमाणे सुखद आणी सुवर्णालंकारांनी शोभित असलेल्या लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरूषानहम ।।२।।

हे अग्ने, जिच्यामुळे, सोने, गाई, घोडे, पुत्र पौत्रादि यांचा मला लाभ होईल अशा माझ्यापासुन दूर न जाणार्या लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव.

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीर्जुषताम।।३।।

गमनाच्यावेळी जिच्यापुढे घोडे, मध्यभागी रथ आहेत आणी हतीच्या गर्जनेने जी आल्याचे कळते अशा वैभववान देवीला मी बोलावतो. ती माझ्यावर कृपा करो

कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीम तृप्तां तर्पयन्तीं।
पद्मे स्थिताम पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम।।४।।

सुहास्यवदना, सुवर्णाच्या आवारात राहणारी, आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेली, तेजस्वी, पूर्णकाम, भक्तकामना पूर्ण करणारी, कमलनिवासी, कमलवर्णा अशा लक्ष्मीला मी बोलवतो.


चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।५।।

चन्द्राप्रमाणे शीतल परंतु तेजस्वी, यशाने तळपणारी, देवांनी सेवा केलेली, उदार, अशा कमळधारी देवीला मी शरण आलो आहे. माझे दरिद्र्य नाहीसे व्हावे म्हणून मी तिची प्रार्थना करतो.

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोंऽथ बिल्वः।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ।।६।।

सूर्याप्रमाणे कान्तिमान असणार्या हे देवी, तुझ्या तपप्रभावाने हा बेलाचा वृक्ष निर्माण झाला ज्याच्या फ़ळाचे हवन केल्याने माझे अज्ञान, आपत्ती आणि दारिद्र्य दूर करोत.

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेस्मिन कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।७।।

कुबेर कीर्ती देवता चिन्तामणी रत्नासह मला प्राप्त होवोत. या देशात जन्मलेल्या मला देव कीर्ती व समृद्धि देवोत.


क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ।।८।।

तुझ्या कृपेनेच भूक, तहान, मालिन्य आणि तुझी ज्येष्ठ भगिनी दरिद्रा यांचा मी नाश करतो. तु माझ्या घरातून सर्व दुःख दौर्भाग्य दूर कर.


ग़ंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम ।
ईश्वरीं सर्व भूतानां तामिहोपह्वये श्रियम ।।९।।

गन्धरुपा, जिंकण्यास कठीण, समृद्ध, गोमयपूर्ण, सर्व प्राणिमात्रांची स्वामीनी अशा त्या लक्ष्मीला मी बोलावतो.

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ।।१०।।

माझी मनोकामना, संकल्प आणि वाचेला सत्यत्व लाभावे. पशुसम्पत्ति, अन्नसम्रुद्धि आणि यश सदैव माझ्या जवळ असावे.


कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम ।
श्रियम वासय मे कुले मातरं पद्ममलिनीम ।।११।।

हे कर्दम माझ्यावर सन्तुष्ट हो. कर्दमामुळे तुझी आई पुत्रवती झाली. त्या तुझ्या, कमलमाला धारण करणार्या, ऐश्वर्यसम्पन्न मातेला माझ्या घरी राहावयास सांग.

आपः स्रुजन्तु स्निग्धनि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ।।१२।।

हे चिक्लीत माझ्या घरी रहा. जलप्रिय देवता, माझ्या घरी मंगल कार्य निर्माण करोत. ऐश्वर्यपूर्ण देवी लक्ष्मीला, तुझ्या मातेला माझ्या घरी वास करावयास लाव.

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङगलां पद्ममालिनीम ।
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।१३।।

क्षीर सागरातून निर्माण झाल्याने आर्द्र असलेली, हत्तीनी जिच्या मस्तकावर आपली सोंड धरली आहे, सर्व प्राण्यांचे यथार्थ पोषण करणारया, पिंगलवर्ण असलेल्या, कमलमाला धारण करणारया, सुवर्णालंकृता, चंद्राप्रमाणे आल्हाद्कारक तेज असलेल्या देवी लक्ष्मीला हे अग्ने माझ्यासाठी बोलाव।

आर्द्रां यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम ।
सुर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।१४।।

आर्द्र, हाती वेताची काठी घेतलेली, सुवर्णमाला धारण कर णारी, सुवर्णाच्या अलंकारांनी नटलेली, सूर्याप्रमाणे दैदीप्यमान अशा लक्ष्मीला हे अग्ने माझ्यासाठी बोलाव।

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम ।।१५।।

जिच्यापासून मला पुष्कळ सुवर्ण, गाई, पशू, दासदासी, घोडे, आणि संतती प्राप्त होईल, हे अग्ने अशा अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव.

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम ।
सूक्तं पंचदशर्चंच श्रीकामः सततं जपेत ।।१६।।

जो नेहमी शुचिर्भूत होऊन, घ्रुताने होम करतो आणि पंधरा ऋचांचे सतत पठण करतो तो इच्छित संपत्ति विपुलपणे प्राप्त करतो.

श्री गणपती अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि | त्वमेव केवलं कर्तासि | त्वमेव केवलं धर्तासी| त्वमेव केवलं हर्तासी| त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि| त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥
ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूच केवळ ( विश्वाचा) निर्माता आहेस. तूच केवळ विश्वाचे धारण करणारा आहेस. तूच केवळ संहार करणारा आहेस. तूच खरोखर हे सर्व ब्रह्म आहेस. तू प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस.

ऋतं वच्मि| सत्यं वच्मि॥ २॥
मी ऋत आणि सत्य या परमात्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून म्हणत आहे.

अव त्वं माम| अव वक्ताराम| अव श्रोतारम | अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥ अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥ अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ३॥
तू माझे रक्षण कर। वक्त्याचे रक्षण कर. श्रोत्याचे रक्षण कर. उपासना देणारया गुरुचे रक्षण कर. ती उपासना धारण करणारया शिष्याचे रक्षण कर. ज्ञान्दात्या व शिष्याचे रक्षण कर. मागच्या बाजूने रक्षण कर.समोरुन रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. वरून रक्षण कर. खालुन रक्षण कर . सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझे रक्षण कर. रक्षण कर.

त्वं वाङमयस्त्वं चिन्मयः| त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः | त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोअसि| त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि| त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥
तू शब्दब्रह्म आहेस. तू चैतन्यमय आहेस. तू आनंदमय आहेस. ज्याहून दुसरे काहीच तत्व नाहि असे सत्, चित् व आनंद तत्व तूच आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तूच ज्ञानमय व विज्ञानमय कोष आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं त्वत्तास्तिष्ठती | सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति | त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः | त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥
हे सर्व जग तुझ्यापासुन उत्पन्न होते। हे सर्व जग तुझ्यामुळे स्थिर राहते. हे सर्व जग तुझ्याठायी लय पावणार आहे. हे सर्व जग तूलाच येऊन मिळते. तू प्रुथ्वी, पाणी, तेज, वायु व आकाश (पंचमहाभूते) आहेस. तू (परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी) ही वाणीची चार रुपे आहेस.


त्वं गुणत्रयातीतः | त्वं देहात्रयातीतः | त्वमवास्थात्रयातीतः | त्वं कालत्रयातीतः | त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम् | त्वं शक्तित्रयात्मकः | त्वां योगिनोध्यायंति नित्यम् | त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥
तू (सत्व, रज व तमस) या त्रिगुणांच्या पलिकडे आहेस. तू (स्थूलदेह, सुक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलिकडचा आहेस. तू (जाग्रदवस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलिकडचा आहेस. तू (भूत, वर्तमान व भविष्य) या तिन्ही कालांच्या पलिकडचा आहेस. तू नेहमी मूलाधारचक्रात स्थित आहेस. तू (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति) या तिन्ही शक्तिंचा आत्मा आहेस. योगी तुझे नित्य ध्यान करतात. तूच ब्रह्मदेव, तूच विष्णु, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच अग्नि, तूच वायु, तूच सूर्य, तूच चंद्र, तूच ब्रह्म, तूच भूः, तूच भुवः, तूच स्वः व तूच ॐकार आहेस.


गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् | अनुस्वारः परतरः | अर्धेंदुलसितम्| तारेण रुद्धम्| एतत्तव मनुस्वरूपम् | गकारः पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्तरुपम् | बिन्दुरुत्तररूपम् | नादः संधानम् | संहिता संधिः | सैषा गणेशविद्या | गणक ॠषीः | निचृदगायत्री छन्दः | गणपतिर्देवता | ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
'गण' शब्दाचा आदिवर्ण 'ग् ' याचा प्रथम उच्चार करुन वर्णातील प्रथमवर्ण ' अ' याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्धचंद्राकार शोभणारया ॐ काराने युक्त ( असा उच्चार केला की) हे तुझ्या बीजमन्त्राचे ( ग् ँ्) रुप होय. गकार हे पूर्वरुप, अकार मध्यरुप, अनुस्वार अन्त्यरुप व बिंदु (हे पूर्वीच्या तीहींना व्यापणारे) उत्तररुप होय. या सर्वांचे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचे एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद् गायत्री हा छन्द ( म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपती देवता आहे. 'ॐ गं गणपतये नमः' हा तो अष्टाक्षरी मंत्र आहे.

एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि | तन्नो दन्तिः प्रचोदयात्॥ ८॥
आम्ही एकदन्ताला जाणतो. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतो. त्यासाठी एकदन्त आम्हास प्रेरणा देवो.

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङकुश धारिणम् । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणंमूषकध्वजम् । रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङगं रक्तपुष्पैः सुपूजितम् । भक्तानुकंपिनंदेवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतं च स्रृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् |एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥

एक दात, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणा क्रमाने) पाश, अंकुश, दात व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचे चिन्ह असणारा, लाल रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला , लाल रंगाचे वस्त्र धारण करणारा, रक्तचंदनाच्या गन्धाने ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचे उत्तम पुजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचे कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधीच प्रगट झालेला, प्रकृतीपलीकडचा देव , असे जो नित्य ध्यान करतो तो योगी ( किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय

नमो व्रातपतये | नमो गणपतये। नमः प्रमथपतये। नमस्तेस्तु लम्बोदरयैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥
व्रतांचा समूह म्हणजे तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकास नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा वरदमुर्तीला नमस्कार असो.

फलश्रुती
एतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते । स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥ सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति। इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति॥ यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥ यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥
यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥ अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥ य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥
ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवाः | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः | व्यशेम देवहितं यदायुः |
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्द्श्रवाः | स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमीः | स्वस्ति नो ब्रृहस्पतिर्दधातु | ॐ तन्मा अवतु | तद् वक्तारमवतु | अवतु माम् | अवतु वक्तारम् |
ॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥ तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शांति॒: । शांति॒:॥ शांति॑:॥
॥ इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं ||








No comments:

Post a Comment